प्रथम मंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूकडून सलामीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी केली. सलामीवीर देवदत्त पेडिक्कल काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर विराट आणि ग्लेन मॅक्सवेलने बंगळुरूकडून तुफान फटकेबाजी केली. यावेळी विराटने टी- ट्वेटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. अखेरच्या काही षटकात मुंबईने जबरदस्त कमबॅक करत झटपट फलंदाज बाद केले. त्यामुळे बंगळुरूचा संघ २० षटकात १६५ धावा करू शकला
बंगळुरूने दिलेल्या १६६ धावांचं आव्हान पार करताना मुंबईची सुरूवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डिकाॅकने सुरूवातीपासूनच फटकेबाजी केली. मात्र त्यावेळी बंगळुरूच्या फिरकीपट्टूनी कमाल केली. मुंबईचे फलंदाज एकामागून एक बाद झाले. अखेर
दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीची फटकेबाजी चर्चेचा विषय ठरली. त्याने ४२ चेंडूत ५१ धावा केल्या. त्यात त्याने ३ षटकार आणि ३ चौकार खेचले. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने ३ महत्त्वाचे गडी बाद केले. तर बंगळुरूकडून हर्षल पटेलने हाॅटट्रिक घेतली.
0 Comments