अभिनेता अर्जुन कपूर बेस्ट किसर ; मला चिकणी मुलं आवडत नाहीत - मलाइका अरोरा



अभिनेता अर्जुन कपूर आणि बॉलिवूड दिवा मलायका अरोराचं  नातं आता जगजाहीर झालं आहे. या दोघांनीही आपण एकमेकांना डेट करत असल्याचं कबूल केलं आहे. मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये या दोघांबाबत सतत चर्चा सुरू असतात. या सगळ्यातच आता मलायकाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यामध्ये ती अर्जुन कपूरबाबत  काही खास गोष्टी सांगत आहे. यासोबतच, ती या व्हिडिओमध्ये तिला कसे पुरूष आवडतात हेदेखील सांगत आहे.

एमटीव्हीच्या ‘सुपरमॉडेल ऑफ दि इयर सीझन २’ या कार्यक्रमात मलायकाने पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. यावेळी शोचे होस्ट मिलिंद सोमण  यांनी तिची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा काही भाग एमटीव्हीच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन  शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ साधारणपणे ३८ सेकंदांचा आहे.

Post a Comment

0 Comments