कोरोना काळात केंद्र सरकारने देशातील भरती प्रक्रिया रद्द केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यांना भरती प्रक्रिया राबवण्यास केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली. अशातच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु ती परीक्षा आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुढे ढकण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात येणारी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन १० ऑक्टोबर रोजी करण्यात आलं होतं. परंतु त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने राज्य सरकारच्या परवानगीने ती परीक्षा पूढे ढकण्यात आली आहे. त्यामुळे टीईटीची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचं ठरवलं आहे. यासंदर्भात वेळापत्रक देखील परिषदेने जाहीर केलं आहे.
परीक्षा लांबणीवर टाकल्यामुळे उमेदवारांना प्रवेशपत्रक ही उशिरा मिळणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्रक १४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी http://mahatet.in/ या बेवसाईटवर जाऊन आपलं प्रवेशपत्रक डाऊनलोड करून परीक्षा केंद्रावर घेऊन यावं, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने म्हटलं आहे.
0 Comments