चौकशी आयोगाच्या कामकाजास वारंवार दिरंगाई, भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने बार्शी तहसीलदारांना निवेदन



बार्शी/प्रतिनिधी:

खऱ्या दंगलखोरांना लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीत घेऊन योग्य ती कारवाई करून शिक्षा द्यावी पण या गोष्टी ला राज्य सरकाराचा व प्रशासनाचा होत असलेल्या दिरंगाई


कोरेगाव भीमा

भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने आज महाराष्ट्र राज्य मध्ये सर्व जिल्ह्यात कलेक्टर ऑफिस ला व तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन सादर केले, विषय कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाच्या कामकाजास वारंवार दिरंगाई होत असले बाबत ०१/०१/२०१८ रोजी कोरेगाव-भीमा येथे जाती-वादी , मनुवादी , दंगलखोरांनी समाजात अराजकता पसरवली व समाजात तेढ निर्माण करून शांततेचा भंग केला.

(Advertise)

अशा खऱ्या दंगलखोरांना लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीत घेऊन योग्य ती कारवाई करून शिक्षा द्यावी पण या गोष्टी ला राज्य सरकाराचा व प्रशासनाचा होत असलेल्या दिरंगाई बद्दल आज सोलापुर जिल्हा मधील बार्शी जेथे लहुजी क्रांती मोर्चा चे तालुकाध्यक्ष मा.अक्षय नवनाथ साळुंखे व भारत मुक्ती मोर्चा तालुका प्रभारी , बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक मा.अभिजित पवार यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

(Advertise)

तसेच लहुजी क्रांती मोर्चा राज्य संघटक, बामसेफ जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय भटके मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रभारी मा.भाऊसाहेब कांबळे सर व बार्शीतील जनवार्ता चे गुणवान पत्रकार, खरे विचारांचे वारसदार, सामाजिक व भौगोलिक जानते मा. महादेव वाघ सर हे उपस्थित होते तसेच भारत मुक्ती मोर्चाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.रणजीत सोणवने सर यांच्या योग्य मार्गदर्शनानुसार या सर्व नियोजनाचे प्रत्यशात बार्शी तहसील येथे अंमलबजावनी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments