आयपीएलच्या उर्वरित मोसमाला येत्या रविवारपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणाऱया आयपीएल स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला 15 ऑक्टोबरला दुबईत होईल. सर्वाधिक वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या लढतीत महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला भिडेल. पूर्वार्धात छान खेळ करणाऱया संघांवर उर्वरित मोसमात नक्कीच दडपण असेल एवढे मात्र निश्चित. बघूया आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कोणता संघ चॅम्पियन ठरतोय ते…
आतापर्यंतची गुणतालिका
दिल्ली (8 सामन्यांमधून 12 गुण) n चेन्नई (7 सामन्यांमधून 10 गुण)
बंगळुरू (7 सामन्यांमधून 10 गुण) n मुंबई (7 सामन्यांमधून 8 गुण)
राजस्थान (7 सामन्यांमधून 6 गुण) n पंजाब (8 सामन्यांमधून 6 गुण)
कोलकाता (7 सामन्यांमधून 4 गुण) n हैदराबाद (7 सामन्यांमधून 2 गुण)
दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई रेसमध्ये
कोरोनामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम अर्धवटच राहिला. अखेर हिंदुस्थानातून ही स्पर्धा यूएईला हलवण्यात आली. त्यामुळे खेळपट्टी व वातावरण यामध्ये फरक पडेल हे पक्के आहे. सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स हे संघ अव्वल चार स्थानावर आहेत. त्यामुळे सध्या तरी या चार संघांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत. पण क्रिकेट हा इतर खेळांप्रमाणे अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे कोणताही संघ अतिआत्मविश्वासाने मैदानात उतरेल असे वाटत नाही.
हिंदुस्थानी फलंदाजांचे वर्चस्व
या मोसमात आतापर्यंत झालेल्या लढतीमध्ये हिंदुस्थानी फलंदाजांचेच वर्चस्व दिसून आले आहे. शिखर धवनने 380 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. लोकेश राहुल 331 धावांसह दुसऱया, फाफ डय़ुप्लेसिस 320 धावांसह तिसऱया, पृथ्वी शॉ 308 धावांसह चौथ्या व संजू सॅमसन 277 धावांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.
हर्षल, आवेश, राहुलची चमक
गोलंदाजांच्या यादीतही हिंदुस्थानी खेळाडूंनीच बाजी मारली आहे. हर्षल पटेल याने 17 फलंदाजांना बाद करीत पहिले स्थान पटकावले आहे. तसेच आवेश खान याने 14 फलंदाजांना बाद करीत दुसरे स्थान मिळवले आहे. ख्रिस मॉरीस 14 फलंदाजांना बाद करीत तिसऱया, राहुल चहर 11 फलंदाजांना बाद करीत चौथ्या व राशीद खान 10 फलंदाजांना बाद करीत पाचव्या स्थानावर आहे.
0 Comments