आठवड्यातच बिग बॉस मराठी चांगलच गाजला आहे. सध्या या शोमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांची. सध्या शिवलीला ताई पाटील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. सध्या शिवलीला यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या आधी शिवलीला यांना बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं.
या व्हिडीओमध्ये शिवलीला म्हणत आहेत की, आजकालच्या महिला पदर मागे सोडतात, केस मोकळे सोडून वावरतात. मात्र या व्हिडीओची तुलना आता त्यांच्या बिगबॉस मधील वागणुकीवर होत आहे. बिगबॉसमध्ये शिवलिला एका गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यात त्यांनी हातवर ओढणी सोडली आहे, त्याचबरोबर केसही मोकळे सोडले आहेत. त्यामुळे शिवलिला यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. 'जगा सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: कोरडे पाषाण' अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
यावेळी तो म्हणाला होता की, ''तो शिवलीला आपल्या बाजूने वळवू शकतो. ती खूप साधी मुलगी आहे. तिला काहीच कळत नाही. तिला माऊली म्हटलं की, ती स्वत:ला देव समजते. तिला वाटत आपण देवी आहोत''. त्याचं हे वक्तव्य खूप चर्चेत आलं होत. जे वक्तव्य नंतर त्याला खूप महागातही पडलं होतं. यानंतर बिग बॉसच्या चाहत्यांनी त्याला चांगलच ट्रोल करत सुनावलं अनेकांनी उत्कर्षला तु असा कसा बोलू शकतोस असे प्रश्न उपस्थित केले होते.
0 Comments