नॅशनल क्रश म्हणून अभिनेत्री रश्मिका मंदनाला ओळखलं जातं. साऊथ अभिनेत्री रश्मिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती आपल्या चित्रपटामुळे नव्हे तर अभिनेता विकी कौशलसोबत शूट केलेल्या जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे.
ही जाहिरात एका कंपनीच्या अंडरविअरची आहे. यामध्ये रश्मिका अभिनेत्याच्या या अंडरगगारमेंटवर फिदा झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. ही जाहिरात पाहून लोक मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीवर टीका करत आहेत, इतकंच नव्हे तर आपल्याला नॅशनल क्रशकडून ही अपेक्षा नसल्याचंही म्हटलं आहे.
या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलं आहे, एक योगा सेशन सुरु असत. यावेळी योग करतांना विकी कौशलची अंडरगारमेंटची स्ट्रीप रश्मिकाला दिसते. ते पाहून अभिनेत्री रोमँटिक होते. त्यानंतर पुन्हा ते पाहण्यासाठी अभिनेत्री प्लॅन बनवते.
तर एका चाहतीने ट्विट करत लिहिलं आहे, ‘रश्मिका मंदना मी तुमची जाहिरात पाहिली, मी खूपच निराश झाले. मला तुमच्याकडून अजिबात अशी अपेक्षा नव्हती. तुम्हाला भान ठेवायला हवं तुम्ही एक नॅशनल क्रश आहेत. लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतात.त्यामुळे तुम्हाला भान ठेवायला हवं’.
पूर्ण जाहिरात पाहून लोक भडकले आहेत. तसेच नेटकरी सोशल मीडियावर अभिनेत्रीला खडे बोल सुनावत आहेत. तसेच नॅशनल क्रशकडून तर ही अपेक्षा नव्हती असंदेखील म्हटलं जात आहे.

0 Comments