बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यामध्ये २५ सप्टेंबर २०२१ रोजी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून शेतातील शेती उपकरणे, अवजारे पाण्यात वाहून गेली आहेत. त्याचबरोबर फळबागांची व सोयाबीन, तूर, उडीद, मूग इत्यादी पिकांची तसेच कांदा, टोमॅटो, मिरची इत्यादी भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घरांची पडझडही झालेली आहे.
तरी बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून, त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून व तहसीलदार सुनील शेरखाने यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
0 Comments