बार्शी/प्रतिनिधी:
बार्शीतील भगवंत क्रिकेट असोसिएशनच्या भिसे प्लॉट येथील सुसज्ज मैदानाचे उद्घाटन सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सु, जिल्हा निवड समितीचे चेरमन उदय डोके व मार्गदर्शक के टी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगवंत क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोविंदा भिसे, उपाध्यक्ष सुनील भराडीया, खजिनदार प्रवीण कसपटे, सचिव अनुराधा माने, सहसचिव हेमलता कांकरीया, प्रमुख प्रशिक्षक आनंद शेलार (ऑफिशियल कोच- वेस्ट इंडिज लिजेन्ड्स), सदस्य सचिन आजबे, ऍड. विक्रम जाधव, विकास माने, सागर मुके, डॉ. गणेश जाधव, डॉ. गणेशकुमार सातपुते, पत्रकार विनोद ननावरे, समाधान विधाते, भगवान लोकरे, ख्यातनाम बॉलर तुकाराम कुंचे यांचेसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांनी मुलांना मार्गदर्शन करताना खेळ आणि अभ्यासाची योग्य सांगड घालण्याचा सल्ला दिला. खेळासोबत अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. खेळात प्राविण्य मिळवीत असताना अभ्यासातही आपण कमी पडता कामा नये, असा कानमंत्रही त्यांनी दिला. जिल्हा निवड समितीचे चेअरमन श्री प्रवीण डोके यांनी भगवंत क्रिकेट असोसिएशनमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील अशी आशा व्यक्त केली. मार्गदर्शक के. टी. पवार यांनी मनोगत व्यक्त करताना भगवंत क्रिकेट अससोसिएशन क्रिकेट जगतातील एक मैलाचा दगड ठरेल, अशी आशा व्यक्त केली.
क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी सुसज्ज आणि सुविधांनी परिपूर्ण असे मैदान असणारी भगवंत क्रिकेट असोसिएशन ही बार्शीतील प्रोफेशनल क्रिकेट ला करियर बनविण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मुला मुलींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. वेस्टइंडीज लेजंडस् सारख्या संघांना प्रशिक्षण दिलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच आनंद शेलार यांचेकडून क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची संधी आता बार्शीतील विद्यार्थ्यांना लाभणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशनच्या सदस्यांनी केले आहेत.
0 Comments