भोंदू बाबा मनोहर मामा भोसलें विरोधात करमाळा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल



करमाळा/प्रतिनिधी: 

अलीकडेच तथाकथित महाराज मनोहर मामा भोसले यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशात आता मनोहर मामा भोसले यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात  बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन करमाळा पोलिसांचे स्वतंत्र पथक मनोहर मामांच्या अटकेसाठी रवाना झाले आहे. दरम्यान या प्रकरणी कलम 376 2 n,‌ 376 d, 354 385 आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला.

उंदरगाव येथे संत बाळूमामांचा अवतार असल्याचं भासवणाऱ्या मनोहर मामा भोसले यांचा बाळूमामा यांच्या नावाने महत्व मंदिर आहे. या मठांमध्ये अनेक भाविक येतात या भाविकांकडून बाळूमामांच्या नावाने आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला होता. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोहर मामा यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता आलेल्या बातमीनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments