बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील धोत्रे येथील मोठमोठ्याने शिवीगाळ करून निघून गेल्यानंतर पोलिसांना बोलावीन असे पोलिस पाटील तरुणास म्हणताच मद्यधुंद तरुणाने त्यांच्यावर चाकूने छाती व पोटावर भोसकले.
पोलीस पाटील तरुणावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनील अंकुश गुरव (रा. धोत्रे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून, जखमी प्रवीण सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस पाटील शाहीर दत्तात्रय जाधवर हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.
0 Comments