“रामायण हे काल्पनिक असून श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य!



बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी प्रभु श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही, असं वक्तव्य केलं आहे. भाजपकडुन या वक्ताव्याचा समाचार घेण्यात आला आहे. अयोध्येत असलेल्या श्रीराम जन्मभुमीचे पुरावे पुरातत्त्व खात्याला मिळाले आहेत. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन करणाऱ्या नासा या संस्थेने देखील राम सेतु मान्य केला आहे, असं प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते रंजन पटेल यांनी दिल आहे.

(Advertise)

 श्रीराम महापुरूष होते हे मानत नाही अन रामायण काल्पनिक आहे, असं म्हटल आहे. परंतु, रामायणातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यातुन काहीतरी शिकण्यासारख आहे, असं जीतन राम मांझी म्हणाले. तसेच रामायणाचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण चांगली बाब असल्याचं रंजन पटेल म्हणाले.

दरम्यान, रामायणाचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण चांगली बाब आहे. कॉलेजमधील मुलांना चांगल्या गोष्टी शिकायला भेटतील, असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.  देशात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे.

Post a Comment

0 Comments