‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार असतील तर आमची युतीसाठी तयारी’; शिवसेनेकडून स्पष्ट संकेत



 आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सुचक वक्तव्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादच्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे इशारा करत ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांनी सेना-भाजप युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शिवसेना आणि भाजप जर पुन्हा एकत्र आले तर मतदारांना आनंदचं होईल, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे पुढील तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर आमची युतीसाठी तयारी आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली होती. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

(Advertise)

मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात. रूळ सोडून रेल्वे कुठेही जात नाही. रेल्वेला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असंही उद्धव ठाकरे कार्यक्रमात म्हणाले होते. त्यामुळे आगामी औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपला युतीचा प्रस्ताव दिलाय का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आपले सर्व मतभेद विसरून भाजप आणि शिवसेना युती होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Post a Comment

0 Comments