पोलीस वसाहतीत दरोडा; पोलिसांला मारहाण करून चार लाखाचे दागिने पळवले


अकलूज/प्रतिनिधी:

 अकलूज येथील पोलीस वसाहत तसेच मसूदमळा परिसरात सशस्त्र चोरट्यांनी दरोडा टाकून रोख रकमेसह ५ लाखाचे दागिने लुटून नेले. या मारहाणीत अकलूज पोलिस ठाण्याचे हवालदार अमोल बापूसाहेब मिरगणे (वय३६) हे जखमी झाले. 
(Advertise)

अकलूज येथील वसंत विहार पोलीस वसाहत येथे अमोल मिरगणे हे हेडकॉन्स्टेबल रूम नंबर ५५ येथे राहण्यास आहेत. त्यांच्या घरातील मंडळी गौरीच्या सणानिमित्त गावाला गेले होते. त्यामुळे ते घराला कुलूप लावून ड्युटीवर गेले होते. ड्युटी आटोपून ते पहाटे ३ वाजेच्या  सुमारास ते घरी परतले होते. त्यावेळी त्यांचे घर उघडे दिसले, आणि आत ४ अनोळखी इसम उचकाउचकी करीत होते. त्यांनी विचारणा केली असता दरोडेखोरांनी त्यांना कोयता, कटावणी आणि दगडाने मारहाण करून किरकोळ जखमी केले.
(Advertise)

त्यांच्या कपाटातील ३० हजार रुपये रोख आणि ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ९० हजाराचा ऐवज लुटून पोबारा केला. या घटनेची फिर्याद अमोल मिरगणे यांनी अकलूज पोलिसात दाखल केली. पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याची नोंद देखील अकलूज पोलिसात झाली. पोलीस निरीक्षक सुगावकर आणि फौजदार जगताप हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments