परांडा/प्रतिनिधी:
केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्र मार्फत वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त फिट इंडिया फ्रीडम यांचे आयोजन परंडा शहरात करण्यात आले होते.
परंडा शहरातील बावची रस्त्यावर ही युवांची दौड आयोजित करण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात शुभारंभ करण्यात आला. यावेळी विकास कुलकर्णी, कमांडो अकॅडमी चे महावीर तनपुरे, किशोर चौधरी, त्र्यंबक आव्हाड आदी उपस्थित होते. कमांडो करिअर अकॅडमी च्या मैदानावर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.
पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन धनंजय काळे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित युवकांच्या 'आरोग्य व देशभक्ती' बाबत काळे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. विकास कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. स्वतःच्या कुटुंबाचा आरोग्यासाठी वेळ देण्याची शपथ युवकांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तनपुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव लांडगे, रंजीत मिस्किन यांनी पुढाकार घेतला.
0 Comments