बार्शीची 'कोठारी लॅब' म्हणजे रुग्णांचा आधार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते विशेष सन्मान



बार्शी/प्रतिनिधी:

मराठवाड्याचे प्रवेश द्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्शी सारख्या ग्रामीण भागात तब्बल ३८ वर्ष अत्याधुनिक अशा लॅबरोटरीच्या माध्यमातून रुग्ण हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या कोठरी लॅबरोटरी कामाची दखल घेऊन राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कोठारी लॅब सर्वेसर्वा व संचालक आदित्य कोठारी यांचा यांना वैद्यकीय सेवा बाबत मुंबई येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या शानदार सोहळा मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. 

हा पुरस्कार सोहळा राज्यातील अग्रणी वृत्त वाहिनी म्हणून ओळखला जाणारा झी २४ तास वाहिनीकडून वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोठारी लॅबला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, ग्रामीण भागातील डायग्नोस्टीक कॅटेगिरीत हा पुरस्कार कोठारी लॅबला मिळाल्याने राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात बार्शीचं महत्त्व आणखी अधोरेखित झालं आहे. 

(Advertise)

सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती भाग असणाऱ्या बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील रोग निदान करण्याच्या अत्याधुनिक सुविधांची गरज ओळखून बार्शीमध्ये पहिली पॅथॉलॉजी लॅबची १९८३ साली डॉ. अशोक कोठारी यांनी  सुरुवात केली. माफक दरात रुग्णांची सेवा देण्याचे काम कोठारी पॅथॉलॉजी लॅबने केली. यातून ग्रामीण भागातील रंजल्या गांजलेल्या व गरीब कुटुंबांना कोठारी लॅब किफायतशीर म्हणून पुढे आली. रुग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई, सोलापूर सारख्या शहरांमध्ये रोग निदान करण्यासाठी जावे लागत होते. त्या गोष्टी कोठारी पॅथॉलॉजी लॅब मुळे सहज शक्य होऊन योग्य ते उपचार रुग्णांन सहज मिळू लागले. कोठारी पॅथॉलॉजी लॅब माध्यमातून डॉक्टर अशोक कोठारी यांनी ईश्वर रुपी रुग्णसेवा केली.

मात्र आरोग्य बाबत होणारे रोजचे बदल सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आला धोका निर्माण होत करत होते. त्यामुळे कोठारी लॅबला आता अत्याधुनिक काळाची गरज निर्माण झाली. त्यातूनच अत्याधुनिक पद्धतीची कोठारी लॅबरोटरी सुरू करण्यात आली. 

कोठारी लॅबच्याच्या कार्याचं एक उल्लेखनीय वैशिष्टय म्हणजे, बार्शीत गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेला 'महावीर धर्मार्थ दवाखाना' मधील गरीब व गरजू रुग्णांची अत्यल्प दरात तपासणी येथे होत आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना ही झाला त्यातून एक नवीन कोठारी लॅबरोटरी चे नाव बार्शीच्या वैभवात झळकू लागले.  दरवर्षी रोटरी, लायन्सच्या माध्यमातून अल्पदरात रक्त तपासणी शिबीर, विविध तपासणीचंही काम केलं जातं. कोरोना महामारीच्या संकटातही कोठारी लॅब आणि टीमने सामाजिक बांधिलकी आणि रुग्णसेवेचा वसा जपलाय. त्यामुळेच, कोठारी लॅबचा आणि बार्शीचा सन्मान झी २४ तासच्यावतीने करण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी, राजेश टोपेंनीही आदित्य कोठारीचं आणि लॅबच्या कार्याचं विशेष कौतुक केलं.

Post a Comment

0 Comments