मंगळवेढा/प्रतिनिधी:
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी शिरर्शी हॉटसन डेयरी जवळ वाळूतस्करांनी पोलीस कॉन्स्टेबल चिरडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये वाळूतस्करांनी वाळूची गाडी थांबवताना कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर याच्यावर भरधाव वेगाने टेम्पो घालून चिरडला. यामध्ये गणेश सोनवलकर यांचा जागीच मृत्यू झाल्या. या प्रकरणामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनवलकर हे सकाळी ९.३० च्या सुमारास गोनेवाडी-शिरशी रोडवरील हॅट्सन डेयरी येथे लोकअदालतचा समन्स बजावण्यासाठी गेले होते. गोनेवाडीचे पोलीस पाटील यांना हॅट्सन डेयरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे वाट पाहत तिथे थांबले होते.
समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला हात केला असता वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घालून चिरडले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा पोलिसांकडून वाळू तस्करी करणाऱ्या टेम्पो चालक विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सोलापूर जिल्हा पोलिस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
0 Comments