राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करूणा शर्मा यांच्यामध्ये वाद सुरु आहे. याच वादासंदर्भात काही कागदपत्र दाखवण्यासाठी त्या पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे दाखवणार होत्या. मात्र, त्या अगोदरच वैजनाथ मंदिर परिसरात विशाखा घाडगे आणि गुड्डी तांबोळी यांच्याशी करुणा शर्मा यांच्याशी वाद झाला.
'त्यांच्यावर तुम्ही बेछूट आरोप करू नका' असं या महिलांनी म्हणताच करुणा शर्मा यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.त्यानंतर त्यांना न्यायालयात दाखल केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या दरम्यान आता करुणा शर्मा यांनी देखील या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. करुणा शर्मा यांच्या तक्रारीवरून ८० ते १०० जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १८८, १४३,५०४,५०६ भादवि नुसार कोव्हिड नियमांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली आहे.
0 Comments