चंदगड/प्रतिनिधी:
शासकिय कार्यालयात देव-देवतांचे फोटो लावण्यास न्यायालयीन आदेशानुसार मनाई असताना देखील चंदगड तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात सत्यनारायणाची पुजा रोजी १ सप्टेंबर २॰२१ रोजी केली आहे.
न्यायालयीन आदेशाची पायपल्ली करणा-या अधिका-यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहीजे या मागणीसाठी निवेदनही देण्यात आले परंतु प्रशासन कानाडोळा करताना दिसून येत आहे.
सदर घटना ही भारतीय संविधान व न्यायालयीन आदेशाची पायमल्ली करणारी आहे. सदर अधिकारी वर्ग यांच्यावर कायदेशीर निलंबणाची कारवाई व्हावी यासाठी सर्व पक्षीय / संघटनांच्यावतीने आज
दि. २/९/२॰२१ रोजी
मा. प्रांताधिकारी साहेब ,
मा. तहसिलदार साहेब,
मा. पोलिस निरीक्षक साहेब,
मा. गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
0 Comments