"गृहमंत्री अमित शहाला गजनी सारखा झटका येतो"



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तब्बल साडेतीन तास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अमित शहांवर निशाणा साधला आहे.

मैने एसे कही नही बोला था, हा गजनीचा झटका भाजपला येतो. अमित शहा गजनी असेल, पण उद्धवजी हे रामशास्त्री बाण्यासारखं काम करणारे आमचे नेतृत्व आहे, हे लक्षात ठेवा, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

माथेरानच्या नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाने भारतीय कामगार सेनेच्या युनियनमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमात अरविंद सावंत यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपली संपूर्ण ताकत लावताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments