परांडा/प्रतिनिधी : परंडा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेत असलेले मूळचे बेलगाव, बार्शीचे रहिवासी असलेले, श्री बापूसाहेब शेळके हे परंडा पोलीस स्टेशन येथे गेल्या आठ दिवसापासून गणपती बंदोबस्त कामी कार्यरत आहेत.
त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची जाणिव सबंध महाराष्ट्राला आहे.गड किल्ले स्वच्छता अभियान, सर्वसामान्य मुलांना शैक्षणिक मदत, समाजातील दलित लोकांना मदत, नैसर्गिक आपत्ती वेळी त्यांनी केलेली मदत, अन्नधान्य वाटप, अशा प्रकारचे आजवर त्यांनी शेकडो सामाजिक उपक्रम केलेले आहेत.
लोक वर्गणीच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून ते सामाजिक सेवा करत आहेत. त्यांनी आजवर महाराष्ट्रात ३०० पेक्षा अधिक व्याख्याने केलेली आहेत. सामाजिक कार्यासाठी त्यांना महाराष्ट्रातून अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. आपली नोकरी सांभाळून सामाजिक कार्याचा छंद त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खास पैलू आहे.
आपल्या वक्तृत्व कलेच्या जोरावर त्यांनी हजारो मित्र परिवार जमा केला आहे. आणि आपल्या कार्याच्या हिकमतीवर महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आज परंडा शहर हद्दीतील भटके शेतमजुरांच्या ४५ मुलांना त्यांनी शैक्षणिक साहित्याचे पूर्ण किट वाटप केले.त्यामध्ये वह्या, पुस्तके ,कंपास, पाटी-पेन्सिल.. पेन, आदी किरकोळ साहित्य होते.
या कामासाठी त्यांना त्यांच्या कार्यावर विश्वास असलेल्या अनेक समाजातील होतकरू बांधवांनी मदत केली..
यापुढेही आमचे कार्य असेच सुरू राहील असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी परांडा पोलीस निरिक्षक श्री सुनिल गिड्डे, नानासाहेब देवकर, ऍड अनंत राशीनकर, आदी उपस्थित होते.
0 Comments