टेम्पो मागे घेताना फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या वृध्द नागरिकाच्या अंगावर आल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. तुकाराम नारायण शिंदे (७०, रा. वैष्णवी हाईट्स, आंबेगाव बुद्रुक) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
भरतकुमार रामकिशन प्रसाद (२६, रा. पंचरत्नेश्वर सोसायटी, धनकवडी, मुळ रा. उत्तरप्रदेश) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत राहुल तुकाराम शिंदे (रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.
दुसर्या घटने धायरी पुलासमोर २२ ऑगस्ट रोजी बेदरकारपणे टेम्पो चालवून पायावरून चालवून पाय फ्रॅक्रच रकत टेम्पोच्या सायलेन्सरमुळे भाजून ज्येष्ठ नागरिक जखमी झाला होता. त्यांचा नुकताच पायाला सेफ्टीक झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवलिंग महादेव दुर्गे (६५, रा. कृष्णाईनगर, हेरोड, वडगाव बुद्रुक) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत विशाल नवलिंगदुर्गे (३९) यांनी फिर्याद दिली आहे.
0 Comments