आर्याने या पोस्टमध्ये या चर्चेबरोबरच अन्य काही गोष्टींचाही खुलासा केला आहे. आर्याने या पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, ' प्रारंभी मी यासगळ्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले होतं. मात्र माझ्या प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये याबाबतच काही प्रश्न विचारण्यात आले होते. शिवाय काही ओळखीच्या व्यक्तींनीदेखील या गोष्टींची चर्चा करत असल्याचे समजले. त्यामुळे यासगळ्या गोष्टींचा खुलासा करण्याचे ठरवले आहे. आर्याने तिच्या खुलाशामध्ये असे म्हटले आहे की, 'गेल्या १२ वर्षांपासून कोणतीही टॅलेंट एजन्सी मला मॅनेज करत नाही.
इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील माझे सर्व फॉलोअर्स ऑर्गेनिक आहेत. तसेच यूटयुबवरील सबस्क्रायबर आणि व्हूजदेखील ऑर्गेनिक आहेत. फॉलोअर्स, सबस्क्रायबर आणि व्ह्यूज् विकत घेण्याची संकल्पना मला अजिबात मान्य नाही. उलट त्याच्या मी विरोधात आहे. या गोष्टी माझ्या नैतिकतेमध्ये बसत नाहीत.' तसेच आर्याने पुढे असेही सांगितले आहे की, 'प्रमोशन किंवा कार्यक्रमांसाठी ती थेट संवाद साधत असून ती स्वत: सर्व मेल किंवा मेसेजेसला उत्तर देते.'
आर्याने तिच्या पोस्टमध्ये सोशल मीडियावर तिला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. आर्याने या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, 'एका प्रसिद्ध गायक आणि संगीतकाराला मी डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ही अफवा मी अनेक दिवसांपासून सातत्याने ऐकत आहे.परंतु मी पुन्हा एकदा सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छिते की ते माझे मार्गदर्शक आहेत. काहीही अफवा असल्या तरी मी कायम त्यांचा आदर केला आहे आणि कायम करत राहीन...' असे आर्याने तिच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
0 Comments