अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार राजेंद्र राऊत यांनी कांदलगाव मध्ये केली पाहणी


बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी प्रांत अधिकारी हेमंत निकम  व तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या सोबत केली.
 
बार्शी तालुक्यात मागील ४-५ दिवसांमध्ये सततच्या पावसामुळे (अतिवृष्टीमुळे) शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तालुक्यातील कांदलगांव या गावास भेट दिली. शेतकरी बांधवांच्या शेतामधील पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून, तेथील चांदणी नदीवरील परिस्थितीचा आढावा घेतला.

शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेताचे व त्यामधील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी व प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे अभिवचन दिले. शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर सोडू नये असे आवाहन केले. यावेळी समस्त कांदलगाव ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments