परंडा/प्रतिनिधी:
परंडा तालुक्यात दोन दिवसापासुन संततधार पाऊस सुरू आहे . देवगाव खुर्द येथील हनुमंत काटे (वय २७) हा तरुण शेतकरी पाण्याची मोटार काढण्यासाठी मगंळवार दि ७ रोजी सकाळी शेतात जात आसताना उल्फा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने मुत्यू झाला .
देवगाव येथील तरुण शेतकऱ्याच्या पुराच्या पाण्यात मुत्यू झाल्याने देवगावात शोककळा पसरली आहे . हनुमंत काटे या शेतकऱ्याला उल्फा नदीच्या पात्रातुन बाहेर काढुन परंडयाच्या जिल्हा उपरुगणालयात आणले असता डॉक्टरांनी तपासुन मयत झाल्याचे घोषीत केले.
डॉक्टरांनी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकाच्या स्वाधिन केले . देवगाव येथे दुपारी दोन वाजताअत्यंविधी करण्यात आली. यावेळी सरपंच महादेव आजिनाथ कोकने, पोलीस पाटील पाडूरंग सुभाष कोकने , सुग्रीव जगनाथ, चौधरी कालीदास , सुभाष कोकने धनाजी भिमा चौधरी, तनाजी शाहु - शिंदे , सचीन दतूबा चौधरी, धनाजी पंडीत शिंदे, सुधीर आवताडे, विलास कोकने, दयानंद कोकने, धनाजी चौधरी आदी उपस्थित होते.
मयत हनुमंत काटे या शेतकऱ्याच्या कुंटूबाला आर्थिक मदत देण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश गणगे यांनी केले आहे.
0 Comments