'काँग्रेसच्या "या" नेत्याला अजित पवारांचा चिमटा वयाची ५० वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलंय’



 अजित पवार आपल्या भाषणात राजकीय चिमटे घेत असतात. पिंपरी चिंचवडच्या डी. वाय पाटील ज्ञानशांती शाळेचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी त्यांनी राज्यमंत्री सतेज पाटील यांना टोला लगावला आहे.

सतेज पाटील यांचं वय ५० वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं आहे. काँग्रेस पक्ष किती दिवस त्यांना राज्यमंत्री ठेवणार आहे, असा टोला अजित पवार यांनी सतेज पाटील यांना लगावला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

(Advertise)

पिंपरी चिंचवड मनपाचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात असून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, असा दावा देखील अजित पवारांनी केला आहे.  दरम्यान, पुणे महानगरपालिकेतील भाजपचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. पिंपरी चिंचवड मनपा ही आपल्याच नेतृत्वात लढवली जाणार आहे. तसेच मी कधीही खालच्या पातळीवर उतरून राजकारण करत नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments