जामगावच्या आयुष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये शिवराज्य अभिषेक सोहळा संपन्न


बार्शी/प्रतिनिधी:

२४ सप्टेंबर रोजी  स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यअभिषेक सोहळा आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र जामगाव (आ )येथे संपन्न झाला.

या प्रसंगी श्रीमती कविता अधांरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या जेष्ठ परिचारिका शनाया कुलकर्णी मॅडम,आण्णा मोरे, व्याख्याते देवा चव्हाण ,अशोक टेकाळे उपस्थित होते, आयुष व्यसनमुक्ती व संशोधन केंद्राचे संचालक डॉ संदीप तांबारे यांनी प्रत्येक संकटांला सामोरे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे कायम प्रेरणादायी आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

(Advertise)

रायजाभिषेकाचे महत्त्व कुलदीप गायकवाड यांनी सांगितले व इतिहासाला उजाळा दिला, कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ रेवती घाडगे यांनी केले तर आभार विनोद वाघमारे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी,रोहित गोरे,सुरज पवार, ज्ञानेश्वर डीसले,अश्विनी डीसले,सिंधू शिनगारे,शुभम मुळे,सुजित ढेकळे  व सर्व स्टाफ यांनी विशेष  परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments