स्वराज्य ध्वजाचे औचित्य साधून आमदार रोहित पवार यांनी 'खर्डा' येथे दसरा मेळावा घ्यावा : सामाजिक कार्यकर्ते भैरवनाथ शिवणे


माढा/प्रतिनिधी:

कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून तयार झालेला जगातील सर्वात मोठा स्वराज्य ध्वजाची सर्वत्र चर्चा चालू आहे. त्यामध्येच राजकीय चर्चांना उधाण येत आहे. यामध्येच आमदार रोहित पवार यांचे कट्टर कार्यकर्ते भैरवनाथ शिवणे यांनी विचारांचे सोने सोने लुटण्यासाठी खर्डा येथे दसरा मेळावा घ्यावा असे म्हटले आहे.

(Advertise)

सामाजिक कार्यकर्ते भैरवनाथ शिवने, पुढे बोलताना म्हणाले युवा वर्गात आमदार रोहित पवार यांचे वेगळी क्रेज आहे. रोहित पवारांवर रोहित पवार यांच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते संबंध महाराष्ट्रभरातून खर्डा येथे येऊ शकतात यामुळे विचारांचे सोने लुटण्यासाठी खर्डा येथे दसरा मेळावा घ्यावा असे प्रतिपादन नाही बोलताना त्यांनी केले. शिवने यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेला सोशल मीडियातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

0 Comments