धक्कादायक घटना, शिक्षकाकडून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार


ठाणे जिल्ह्यातील  डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीच्या शेजारील कल्याण शहरातून एक धक्कादायक  माहिती समोर आली आहे.

शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिम परिसरात आरोपी शिक्षक आणि त्याची पत्नी हा खासगी शिकवणी घेतो. त्याच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कल्याण पश्चिम परिसरात एक महिला शिकवणी घेते. ही महिला काही दिवसांपूर्वी बाहेरगावी गेल्याने तिचा पती सर्व विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता. याच दरम्यान त्याने आट वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर एक दिवस चिमुकलीने शिकवणीसाठी जाण्यास नकार दिला आणि रडण्यास सुरुवात केली. यावेळी तिला पालकांनी विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुदर तालवाला याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कल्यामधील बाजारपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments