बार्शी/प्रतिनिधी: लॉज चालक आणि मालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार आहे. बार्शीतील लॉज चालक हे अल्पवयीन मुली सोबत असतानाही रूम देत आहेत. बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तक्रारींमधून हा धोकादायक प्रकार समोर आला असल्याचेवृत्त एका दैनिकाने दिले.
यामध्ये म्हटले आहे की, पीडित अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने बार्शीतील दोन लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले असल्याचे सांगितले आहे. तसेच संशयित आरोपी याने कव्हे येथील एका हॉटेलवर घेऊन गेला असल्याचेही सांगण्यात आले आहे.
लॉज चालवण्याच्या नियमावलीमध्ये ग्राहकाचे ओळखपत्र बघणे आणि त्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे खातरजमा न करता केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने लॉजमध्ये अशी माहिती न घेता प्रवेश दिला जात असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत संबंधित प्रशासनाकडून साधी चौकशी सुद्धा केली जात नाही. त्यामुळे असे गंभीर गुन्हे घडत आहेत. सध्या बार्शी शहर आणि तालुक्यांमध्ये लॉजवर प्रशासनाने कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बार्शी शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही लॉज व्यवसायाचे प्रचंड पेव फुटले आहे. जिथे रहदारी नाही अशा दुर्गम भागात लॉज म्हणजे अत्यंत सुरक्षित ठिकाण समजले जाते. आज पर्यंत लॉजवर झालेल्या कारवाई बघितल्या तर बऱ्याच वेळा लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झालेले आहे. याकडे गांभीर्याने पाहून चौकशी करून संबंधित लॉज मालक आणि चालकांवर योग्य ती ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
0 Comments