आमदार राजेंद्र राऊत यांची बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी; मदतीसाठी शासन दरबारी प्रयत्न


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यात मागील दोन दिवसांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे (अतिवृष्टीमुळे) शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याबाबत नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी व त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आमदार राजाभाऊ राऊत यांनी शासन दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत.

(Advertise)

आमदार राजाभाऊ राऊत यांनी तालुक्यातील मुंगशी (वाळूज), सासुरे या गावांना भेट दिली. शेतकरी बांधवांच्या शेतामधील झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे या ठिकाणच्या नागझरी नदीवरील बंधा-याची पाहणी करून, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, माजी जि.प.सदस्य संतोष दादा निंबाळकर, जेष्ठ नेते कुंडलिराव गायकवाड, नानासाहेब धायगुडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments