सुर्डी येथे शेतकऱ्यांना कृषीदुतांकडून मिळाले मौल्यवान मार्गदर्शन...


सुर्डी \ प्रतिनिधी :  ग्रामीण कृषी जागरूकता आणि कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 अंतर्गत कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील कृषीदुत ऋषिकेश देवकर, कृषीदुत समाधान डोईफोडे, कृषीदुत अनिकेत खटाळ यांचे बार्शी तालुक्यातील सुर्डी या गावामधील शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कृषीदुतांच्या शास्त्रीय प्रत्यक्षिके सल्याचे शेतकऱ्यांना खूप फायदा झाल्याचे सांगण्यात येते, बीज प्रक्रिया, लागवड पद्धती, माती परीक्षण तसेच आधुनिक शेती यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचे मार्गदर्शन तेथील शेतकऱ्यांना करण्यात आले. यासाठी त्यांना  महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा.श्री. डॉ.यु.बी.होले, कार्यक्रम समन्वयक डॉ.बी. टी. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.जे वाघमारे व इतर विषयतज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments