सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषय तातडीने मार्गी लावणार : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर



सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, सूचना आणि त्यावरील उपायांवर सर्व सोलापूरकरांसाठी खुले चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकी दरम्यान उपस्थित सदस्यांनी सोलापूरच्या विकासाशी निगडित अनेक सूचना विषद केले त्यात प्रामुख्याने सर्व सोयींनीयुक्त असलेल्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा तात्काळ सुरू करणे, स्मार्ट सिटी मध्ये सोलापूर महानगरपालिकेचा हिस्सा देणे आणि झालेली कामे हस्तांतरित करुन घेणे, सोलापूर शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी उजणीच्या दुहेरी जलवाहिनीचे कार्य तात्काळ प्रारंभ करणे, सोलापूर शहरांतर्गत दोन उड्डाण पुलांचे काम त्वरित मार्गी लावणे, हैद्राबादच्या धर्तीवर सोलापूरातुन सर्व प्रमुख महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेसाठी रिंग रोडचे काम एन. एच.ए.आय. कडुन करुन घेणे, जुळे सोलापूर आणि हद्द वाढ भागात मुलभुत नागरी सुविधांची कैक वर्षांपासूनची वणवा दुर करणे.

शहराच्या सार्वजनिक वाहतूकीसाठी परिवहन बस सेवा सुधारणा करणे आणि नागरीकांना प्रोत्साहन देणे, नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही प्रशासकीय अडचण निर्माण होऊ न देणे, सोलापूरात आय.टि.पार्क निर्माण करण्यासाठी व्यापक तरतुदी जसे जमीन, वीजपुरवठा, इंटरनेट कनेक्शन आणि प्रशासकीय परवानग्या मध्ये भरिव सुट देणे, सोलापूरच्या रामवाडी परिसरातील शासनाच्या मालकीच्या जागेत अॉलिम्पिक स्टँडर्डचे सर्व खेळांचे भव्य शासकीय स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटरची निर्मिती करणे, एअरपोर्टच्या धर्तीवर सोलापूरचे सध्याचे सोलापूर बस स्थानक बस पोर्ट म्हणून विकसित करणे, महाराष्ट्र राज्य सरकारने सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर तिर्थक्षेत्र कॉरिडॉरमध्ये समावेश करणे.

 

सोलापूरकरांनी सोलापूर विकास मंचच्या वतीने आयोजित बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व समस्या आणि त्यावरील उपायांचे निवेदन तात्काळ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सुपूर्द करण्यात आले. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय तातडीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकाम त्वरित पूर्ण करुन उडान योजने अंतर्गत नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत ह्या पत्राचे स्मरण मंचच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना करुन दिले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकाम विषयी तातडीने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायाबद्दल पाठपुरावा करणार असल्याचे सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना आश्वस्त केले. सोलापूर विकास मंचच्या बैठकीचे प्रास्ताविक विजय कुंदन जाधव यांनी केले, सुत्रसंचालन योगीन गुर्जर यांनी केले आणि उपस्थित सदस्यांचे आभार मिलिंद भोसले यांनी मानले. बैठकीत आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी केतन शहा, अॅड.प्रमोद शहा, अॅड. संदीप बेंद्रे, आनंद पाटील, किसन रिकीबे, विद्या भोसले, सुहास भोसले, भक्ती जाधव, शांता येळंबकर, इक्बाल हुंडेकरी, अमित कामतकर, सचिन चौधरी, जावेद आतार, राजु मोहोळकर, राजकुमार कोळी, रोहित कल्लशेट्टी, अर्जुन रामगिर, चंद्रकांत ईश्वरकट्टी, शिवाजी उपरे, हेमंत निंबर्गी, अतुल कोटा, फारुक बिजापूरे, रमेश खुने मल्लिकार्जुन परळकर, मनिष गांगजी, नितीन अणवेकर, सतीश तमशेट्टी, युसुफ पिरजादे, ज्ञानेश्वर निळ, दिपक बनसोडे, सतीश क्यामा, गिरिराज यादव, रामदास मादगुंडी, प्रकाश भुतडा, प्रियदर्शन साठे, दीपक पाटील, महादेव सुतार, विनय कल्याणशेट्टी, शिवाजी उपरे, सिद्धार्थ तळभंडारे, प्रतिक खंडागळे, डॉ. राजु मोहोळकर, श्रीकांत अंजुटगी, धनराज बगले आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments