आता लर्निंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही !


करोनामुळे कार्यालये बंद असल्याने अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आता लर्निंग लायसन्ससाठी घेतली जाणारी परीक्षा घरूनच देता येईल असा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला

कसा आहे राज्य सरकारचा निर्णय ?

 राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता लर्निंग लायसन्ससाठी द्यावी लागणारी परीक्षा घरातूनच देता येणार आहे तसे आदेश राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत. तसेच ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लर्निंग लायसन्स दिले जाते यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे.

 ही सुविधा पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल अशी घोषणा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments