खुशखबर! मोदी सरकार या महिन्यात देणार मोफत LPG…


जर तुम्हाला सुद्धा स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन (LPG connection) घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana) अंतर्गत मोफत स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन देत आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY Scheme) पुढील टप्प्याच्या रूपरेषेला अंतिम रूप दिले आहे आणि पुढील महिन्यापासून ती सुरू होण्याची आशा आहे.


१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोफत स्वयंपाकाच्या एलपीजी कनेक्शन योजनेचा विस्तार (Ujjwala) करण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्र्यांनी म्हटले होते की, आणखी एक कोटी लाभार्थ्यांना या योजनेच्या कक्षेत आणले जाईल. जर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वकाही जाणून घेवूयात…

Pradhan Mantri Ujjwala Yojana च्या अंतर्गत सरकार गरीबी रेषेच्या खाली असलेल्या कुटुंबांसाठी LPG Connection देते. हे कनेक्शन कुटुंबातील महिलेच्या नावावर दिले जाते. यातून ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण होण्यास मदत होते.

असा करा ऑनलाइन अर्ज

१. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी सर्वप्रथम Pradhan Mantri Ujjwala Yojana ची अधिकृत वेबसाइट pmujjwalayojana.com आपल्या कम्प्युटरमध्ये ओपन करा.

२.  वेबसाइट उघडताच होमपेज दिसेल. तुम्ही डाऊनलोड फॉर्मवर जाऊन क्लिक करा.

३. डाऊनलोड फॉर्मवर क्लिक करताच तुमच्या समोर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा फॉर्म दिसेल.

४. तो भरावा लागेल. यामध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर, एक कॅप्चा भरावा लागेल. यानंतर तुम्हाला ओटीपी जनरेट करण्याच्या बटनवर क्लिक करावे लागेल.

५. यानंतर तुम्ही हा फॉर्म डाऊनलोड करा.

६.  हा फॉर्म जवळच्या एलपीजी एजन्सीकडे जमा करण्याचे काम करा.

७. यासोबत तुम्हाला काही डॉक्युमेंट सुद्धा द्यावे लागतील. जसे की आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचे प्रमाणपत्र, तुमचे छायाचित्र.

८. डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्यानंतर एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाईल.

 


Post a Comment

0 Comments