Indian Navy परीक्षा नाही थेट मुलाखत भारतीय नौदलात आधिकारीपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू



 भारतीय नौदलाच्या Indian Navy वतीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission of the Indian Navy) अंतर्गत अधिकारी पदासाठी अर्ज (Application) प्रक्रिया सुरु (Prosess Start) झाली आहे. यामध्ये विविध विभागांसाठी ५० पदांकरिता ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

ही प्रवेश प्रक्रिया केवळ पुरुष उमेदवारांसाठी (Male Candidate) आहे.

 महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर यंदा लेखी परीक्षा होणार नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (SSB) मुलाखती (Interview) होणार आहेत.

अशी होईल निवड

 पदवीतील गुणांच्या आधारावर उमेदवारांना एसएसबी प्रक्रियेसाठी निवडण्यात येणार आहे. यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून बीई किंवा बीटेक (BE or BTech) पदवी आवश्यक आहे.  उमेदवारांना पदवीत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

 या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ पर्यंत ठेवण्यात आले आहे.  तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे (NCC) 'सी' सर्टिफिकेट असल्यास उमेदवारांना पदवीच्या गुणांमध्ये पाच टक्क्यांची सवलत देण्यात येईल.

 कोणत्या पदासाठी किती जागा
एकूण ५० जागांसाठी असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी ४७ जागा जनरल सर्व्हिससाठी, तर ३ जागा हायड्रो केडर पदासाठी असणार आहेत.

अर्ज कसा करायचा?

 या पदासाठी अर्ज ऑनलाईन (Apply online) पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व यासंदर्भातील अधिक माहिती उमेदवारांना joinindiannavy.gov.in या नौदलाच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करता येईल. तसेच इच्छुक उमेदवारांना २६ जून पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल.

Post a Comment

0 Comments