बार्शी! अंधारे हॉस्पिटल व रेणुका मंगल कार्यालय येथील चोरी गेलेल्या मोटरसायकल चोरास बार्शी शहर पोलिसांनी केली अटक


बार्शी/प्रतिनिधी:
 
बार्शीतील अंधारे हॉस्पिटल तसेच रेणुका मंगल कार्यालय येथून चोरीला गेलेला दोन मोटर सायकल व मोटरसायकल चोराला पकडण्यात बार्शी शहर पोलिसांना यश. बार्शी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिनांक ०३.०६.२०२१ दिनांक १६.०६.२०२१ रोजी मोटरसायकल चोरीचे गुन्हे नोंद झाले होते.

 वाढत्या मोटरसायकल चोरी यांना आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्री ज्ञानेश्वर उदार यांनी पथक नेमूनसह पो. निरीक्षक अमोल ननवरे यांनी बार्शी शहराच्या गर्दीच्या ठिकाणी सापळा रचून संशयित इसमावर नजर ठेवत दिनांक १६.०६.२०२१ रोजी शिवाजी कॉलेज चौक बार्शी येथे एक शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच २५ आर. ४२९२ या गाडीवर गडबडीत जात असताना दिसला असता त्याच्यावर संशय आल्याने त्याच थांबून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव माणस महादेव हुंबे राहणार धामणगाव तालुका बार्शी सांगितले, त्यावेळी त्याच्या ताब्यातील मोटरसायकल कोणाचे आहे याबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्यामुळे त्याच्यावर अधिक संशय आल्याने त्याच विश्वासात घेऊन त्याचा साथीदार मोहन देशमुख या दोघांनी चोरी केल्याची त्याने कबुली दिली. 

तसेच त्या दोघांनी दिनांक ३०.०५.२०२१ रोजी रेणुका मंगल कार्यालय अलीपुर रोड बार्शी येथून आणखीन एक मोटारसायकल क्रमांक एम एच ४५ झेड ८४५३ मोटरसायकल चोरी असल्याचे सांगितले त्या दोघांना अटक करून मोटरसायकली बार्शी शहर पोलीस स्टेशन जप्त करून घेतले आहे .

Post a Comment

0 Comments