सोलापूर : सोलापूर शहरामधील विविध युवक मंडळांना व्यायाम करण्याकरीता व्यायाम साहित्याची अत्यंत आवश्यकता होती. सदर युवकांनी आमदार प्रणिती शिंदे यांना व्यायाम साहित्य मिळण्याकरीता निवेदनाव्दारे मागणी केलेली होती.
यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ आमदार स्थानिक विकास निधीतून १) प्र.क्र. १६ मसिहा सामाजिक संस्था, मसिहा चौक ( ३लाख), २) प्र.क्र. १८, मित्रप्रेम सांस्कृतिक क्रिडा मंडळ, ७० फुट रोड भारतरत्न इंदिरा नगर (५ लाख), ३) प्र.क्र. १३, बापूजी तरुण मंडळ तालीम संघ, बापूजी नगर (५लाख), ४) प्र.क्र. २२, नवयुग जांबवीर तरुण मंडळ, मधुकर उपलप वस्ती (३ लाख), ५) नेताजी सुभाष संघ, रामवाडी (५लाख) आदि. युवक मंडळांना अत्याधुनिक व्यायाम साहित्य देण्यात आले व त्याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामुळे या भागातील युवकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे मनापासून धन्यवाद दिले व आभार मानले. यावेळी विविध युवक मंडळाचे सर्व पदाधिकारी, खेळाडू व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.
0 Comments