वेळापूर : खासदार शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर शरद पवारांनी वधू वरांना शुभाशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांनी वधू-वरास शुभेच्छा दिल्या. यावेळी उत्तम जानकर यांनी मुलगी डॉक्टर असल्याची माहिती दिली. त्यावर शरद पवारांनी मुलीला प्रॅक्टिस करणार ना असा प्रश्न उपस्थित केला. तसेच उत्तम जानकर यांच्या मुलाला मुलीला प्रॅक्टिस करु देण्याची सूचना दिली. यावर नवरदेव जीवन जानकर याने आपला व्यवसाय असल्याची माहिती शरद पवार यांना दिली.
उत्तम जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहे. त्यांनी माळशिरस मतदारसंघातून २०१९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप आमदार राम सातपुते यांच्या कडून निसटता पराभव झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर आणि जत येथील सुभाषराव माने पाटील यांची कन्या डाॅ. स्नेहल पाटील यांचा आज शनिवारी विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास वेळ काढून दुपारी २.३० वाजता हेलिकाॅप्टरने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हजेरी लावून वधू-वरांना आशीर्वाद दिले.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, उमेश पाटील, फत्तेसिंह माने पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, पांडुरंग माने देशमुख, माजी उपसभापती मच्छिंद्र ठवरे, शिवाजीराजे कांबळे, जि.प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, बाळासाहेब लवटे, उपसरपंच जावेद मुलाणी, के पी काळे पाटील, अजय सकट यांच्यासह नातेवाईक मान्यवर उपस्थित होते.
विवाह सोहळा शासकीय नियमांचे पालन करून साध्या पध्दतीने सोशल डिस्टन्सिग ठेवून संपन्न झाला. कोरोना परिस्थिती असल्याने या विवाह सोहळ्यास मोजक्याच राजकीय मंडळींना आमंञण दिले होते.
0 Comments