सातवीत शिकणारी मुलगी सात महिन्यांची गरोदर; चुलत भावासह दोघांना अटक


सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणारा तरुण, तसेच नात्यातील अल्पवयीन मुलाने वारंवार लैंगिक अत्याचार केला असून पीडिता गरोदर राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे.

माण तालुक्यात एका गावातील एका वस्तीवर पीडिता आपल्या कुटुंबीयांसमवेत राहते. जुलै २०२० मध्ये सदर पीडिता घरात एकटी असल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिला धमकी देवून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी पीडितेसोबत जबरदस्तीने शरीरसंबध ठेवले. तसेच सदर प्रकरणाची माहिती मिळालेल्या नात्यातील अल्पवयीन मुलानेही पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. त्यानेही तिला ब्लॅकमेल करुन जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. सदर प्रकार जुलै २०२० ते ऑक्टोबर २०२० दरम्यान सुरु होता.

दोन्ही दोषींनी वारंवार जबरदस्तीने ठेवलेल्या शरीरसंबंधांमुळे पीडितेला दिवस गेले. ती मुलगी सहा ते सात महिन्यांची गरोदर असताना सदर प्रकार उघडकीस आला. यानंतर याबाबतची तक्रार मुलीच्या आईने दिल्यानंतर आरोपींविरुद्ध बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली, तर विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले. आज एकोणीस वर्षीय आरोपीस सत्र न्यायालय वडूज यांच्यासमोर हजर केले असता, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Post a Comment

0 Comments