पंढरपूर/प्रतिनिधी:
नाशिक येथील अरविंद सोनार यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अंगाला स्टीलचे चमचे अंगाला नाणीची चिटकण्याची घटना समोर आली होती. तीच घटना पाहून पंढरपूर येथील कुंभार घाट लगत राहणाऱ्या नरहरी कुलकर्णी यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांच्या अंगाला स्टीलचे चमचे व नाणी चिटकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र नरहरी कुलकर्णी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर आरोग्य संदर्भात कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाशिक पाठोपाठ पंढरपुरात कोरोना लसीकरणानंतर स्टीलचे चमचे व नाणी चिटकण्याची घटना..
नाशिक शहरात राहणाऱ्या अरविंद सोनार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. त्यानंतर त्यांनी घरी आल्यानंतर घरातील स्टीलची भांडी व पैशाचे ठोकळे अंगाला चिटकत असल्याचा दावा केला होता. त्याबाबत प्रसार माध्यमातूनही दाखवण्यात आले होते. त्याचाच परिचय पंढरपूर शहरातील नरहरी कुलकर्णी यांना आला आहे. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमं येणाऱ्या बातम्या त्यांनी पाहिल्या. त्यानंतर त्यांनी घरातील स्टीलचे चमचे व नाणी अंगाला लावून पाहिले. ते नाणे व चमचे अंगाला चिटकत असल्याचे दिसून आले. २० मार्च रोजी नरहरी कुलकर्णी यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. मात्र त्यावेळी असा कोणताही प्रयोग केलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
नरहरी कुलकर्णी यांच्याकडून इतर नागरिकांना लसीकरणाचे आव्हान..
पंढरपूर शहरातील कुंभार घाट येथे राहणाऱ्या नर्हरी कुलकर्णी यांनी कोरोना ची दुसरी लस घेतली. त्यानंतर त्यांनी अंगाला स्टीलचे चमचे व नानी चिटकून पाहिजे असता. त्यांच्या अंगाला नाणी व स्टीलचे चमचे चिटकत असल्याचा अनुभव त्यांना आला. मात्र पहिल्या व दुसऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर नरहरी कुलकर्णी यांना आरोग्य संदर्भातील कोणताही त्रास जाणवला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबरीने नरहरी कुलकर्णी यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहनही केले आहे. डॉक्टरांनीही याबाबत कोणतेही शास्त्रीय कारणे नाही असे सांगितले आहे.
0 Comments