दशक्रियाहून गावी चाललेल्या पती-पत्नीचा अपघात; पत्नीचा जागेवरच मृत्यू, तर पती जखमी! सोलापूरच्या वाहनचालकास पकडले!



पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) हद्दीतील धुकटे फर्निचरच्या समोर एका दुचाकीवरून चाललेल्या पती-पत्नीच्या जोडीला पाठीमागून चाललेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात एक महिला जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.४) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

सदर अपघात हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी ८ तासाच्या आत अज्ञात वाहनाचा शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. लता पांडुरंग दुधाळ (वय-४८, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर या अपघातात पांडुरंग दुधाळ (वय-५०) हे किरकोळ जखमी झाले आहेत. वाहन चालक गौरव गौतम शिवशरण (वय २१, रा देगाव, दफळेकर नगर, सोलापूर) यास पोलिसांनी अटक केली आहे.

या अपघातात लता दुधाळ यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर त्यांचे पती पांडुरंग दुधाळ जखमी झाले. हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले. घटनास्थळी जाऊन तपास केला असता त्यांना सदर अपघात हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी अपघात करणाऱ्या चार चाकी गाडीचा शोध घेऊन वाहन चालक गौरव शिवशरण यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तो चालवीत असलेली xcent MH13 CU 8794 ही चारचाकी गाडी ताब्यात घेतली.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस नाईक शिवाजी दिवेकर, संतोष आंदुरे, वॉर्डन बाळू घाटगे, विशेष पोलीस अधिकारी शाहिद तांबोळी,सूरज टिळेकर यांनी केली.

Post a Comment

0 Comments