सोलापूर! स्मार्टसिटीचं कामं अर्धवट काम अन् बेशिस्तपणा मुळे ट्रॅक्टरखाली चेंगरून दत्तचौकात बालकाचा मृत्यू


 
सोलापूर : शहरातील स्मार्टसिटी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावरील ट्रॅक्टरच्या खाली चेंगरून एका शाळकरी मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर शहरातील दत्त चौकात घडली. दत्तचौक ते लक्ष्मी मार्केट रस्त्यावर शुभराय टॉवर समोर हा अपघात घडला. समर्थ धोंडीबा भास्कर ( वय १३,  उत्तर कसबा, पंजाब तालीम, सोलापूर) असे ट्रॅक्टरखाली चेंगरून ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. 

स्मार्टसिटी योजनेत रस्त्याचं काम या परिसरात गेली दीडवर्ष सुरु आहे. यासाठी आजोरा आणि मजूर घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून सायकलवर निघालेला समर्थ जागीच ठार झाला.
ट्रॅक्टर आणि सायकल चालक दोघेही लक्ष्मीमार्केटच्या दिशेनं निघाले होते. ट्रॅक्टरला एक ट्रॉली होती. ट्रॅक्टरचं मागील चाक आणि ट्रॉली याच्यामध्ये सापडून सायकलस्वार चाकाखाली चिरडला गेला. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयास पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाणे करीत आहे. पोलीसांनी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतलं आहे. तो देगांव येथील रहिवासी आहे. फौजदार चावडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.




 

Post a Comment

0 Comments