अकलूज/प्रतिनिधी:
राज्यातील सर्व घटकांना आपल्या मागण्या मांडण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. सध्याची राष्ट्रवादी ही शरद पवार यांच्या विचारांची राष्ट्रवादी नाही. शरद पवार साहेबांच्या विचारांचे राष्ट्रवादी असती तर राज्यातील जनतेला रस्त्यावर बसण्याची वेळ आली नसती असा हल्लाबोल भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केला आहे.
माळशिरस तालुक्यातील अकलूज, नातेपुते, माळीनगर या ग्रामपंचायतींचे नगर परिषद व नगर पंचायत यांच्यात रूपांतर करावे, म्हणून ग्रामस्थांच्यावतीने उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा दिवसांपासून प्रांत कार्यालय येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवारी तिन्ही ग्रामपंचायत मधील महिला नागरिकांनी या साखळी उपोषणात सहभाग घेतला. महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या अकलूज येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
महा विकास आघाडी सरकार हे जाणून-बुजून दोन दिवसांचे अधिवेशन घेत आहे राज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी युवक मराठा आरक्षण तसेच स्थानिक स्वराज यातील ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे राज्य सरकार मुद्दामून दोन दिवसाचे अधिवेशन घेत आहे. या सर्व प्रश्नावर राज्य सरकार भारतीय जनता पार्टी फाडून खाईल या भीतीपोटी राज्य सरकारकडून दोन दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात आल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
राज्य सरकार मधील मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून अकलुज व नातेपुते ग्रामपंचायतचे नगरपालिका व नगरपरिषद मध्ये रुपांतर करावे. पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना बहिणी दिसत नाहीत का जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मामांनी एकदा अकलूज येथे येऊन बघावे त्यांच्या बहिणी रस्त्यावर बसलेल्या आहे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी अकलूज व नातेपुते गावातील भगिनींना न्याय घ्यावा चित्रा वाघ यांनी केली आहे.
0 Comments