बार्शी! 'वाणी प्लॉट' येथे मध्यरात्री सशस्त्र दरोडा ४ लाख, ३१ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास


बार्शी/प्रतिनिधी:

दि १३/०६/२०२१ रोजी गजेंद्र घेना जाधव वय या ६८ वर्ष राहणार वाणी प्लॉट यांच्या घरावर रात्री दोनच्या सुमारास सशस्त्र दरोडा घालून चोरट्यांनी ४ लाख, ३१ हजारांचा ऐवज पळवला अशी फिर्याद त्यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजेंद्र जाधव हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते त्यांची पत्नी दोन मुले व त्यांच्या मुलांच्या दोन बायका सह वाणी प्लॉट येथे एकत्र राहत असून दि १३ रोजी इतर लोक आपापल्या रूम मध्ये जेवण करून झोपले असता फिर्यादी व त्यांची पत्नी हे रात्र अकरा वाजता वाजता हॉलमध्ये झोपलेले असताना रात्री दोनच्या सुमारास त्यांना झोपमोड होऊन जाग आलीअसता पाहिले, की त्यांच्याजवळ दोन इसम हातात चाकू व दांडके घेऊन उभे होते. 

तसेच त्यांनी झीरो बल्प च्या मंद प्रकाशात पाहिले की तिसऱ्या इसमाच्या हातात टॉर्च होती त्यांच्या पत्नीही जाग्या झालेल्या त्यांना दिसले व त्यांच्या जवळ एक इसम हातात लाकडी दांडके घेऊन थांबलेला होता, व इतर दोन इसम कपाटापाशी उभे असलेले त्याला दिसले हे इसम अंदाजे २० ते २५ वयोगटातील अंगाने मध्यम बांध्याचे तरुण होते. 

त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता फिर्यादी जवळ उभ्या असलेल्या एकाने त्यांना चाकूचा धाक दाखवून लाकडी दांडकयाने उगारून पायावर मारत चूप बैठने का lहीलने का नई तुम्हारे पास पैसा हैl तुम्ही हीले तो बुडी को मार देंगे असे धमकावून दांडक्याने पायावर मारत कपाट उचकटून कपाटा मधील सोने मोबाइल व रोख रक्कम ४ लाख, ३१ हजारांचा ऐवज चोरून कीचनच्या मागच्या दारातून निघून गेल्याची फिर्याद बार्शी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिली असून पुढील तपास बार्शी शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर उदार हे करत आहे.

Post a Comment

0 Comments