"मी पुराव्यांसह सांगतोय, कोरोनामुळे झालेल्या मृत्युसाठी मोदीच जबाबदार" या नेत्यांनी केली मोदींवर खरमरीत टिका



सध्या जगातील अनेक देशात कोरोना स्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. परंतू भारताला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. या दोन लाटेमध्ये अनेक भारतीयांना जीव गमवावे लागले आहेत. यावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

मी पुराव्यांच्या सहाय्यानं बोलत आहे. जेव्हा सर्व डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी सांगितलं होतं की कोरोनाची दुसरी लाट येणार आहे, त्यावेळी योग्य त्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सल्ला ऐकला नाही आणि आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतले. भाजपनं प्रस्ताव पारित करत पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. या सर्वांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

साडेचार महिन्यांत देशाच्या लोकसंख्येतील केवळ ३.२ कोटी लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आणि १६ कोटी लोकांना एक डोस मिळाला. अशात तिसरी लाट आली तर काय होईल?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, याआधी त्यांनी लसीकरणाच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसत असल्यानं पुरेशा प्रमाणात लस पुरवठा होत नाही. त्यामुळे राज्यांकडून लसीकरण केंद्र बंद केली जात आहे, अशा आरोप त्यांनी यापुर्वी देखील केला होता.

Post a Comment

0 Comments