पंढरपूर/प्रतिनिधी:
राज्यातील महाविकास आघाडी सरकार मध्ये देवस्थान समित्यांचे वाटप करून घेण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेस कडे गेले आहे. काँग्रेसमधील अनेक इच्छुकांची नावे ही आघाडीवर येत आहे. यातून राजकीय पक्षातील कार्याध्यक्षा व आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे, विद्यमान मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे यात कोणाला पांडुरंग पावतो पाहणे गरजेचे आहे.
आमदार प्रणिती शिंदे व सत्यजित तांबे यांचे नाव आघाडीवर
महा वकास आघाडी सरकारमधील काँग्रेसकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देण्यात आली आहे तर शिवसेना व राष्ट्रवादी कडे आक्रमणे सिद्धिविनायक ट्रस्ट व शिर्डी मंदिर समिती वाटेला आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती वर गेल्या दोन वर्षापासून अध्यक्ष पद रिक्त आहे महाा विकास आघाडी मधील सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडे ही समिती देण्यायात आली आहे. त्यामुळे या समितीवर सोलापूर मध्य विधानसभेचे आमदार प्रणिती शिंदे व युवक काँग्रेस राज्य अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. यासाठी पक्षश्रेष्ठींकडे या नावाचा आग्रह धरण्यात आला असल्याचे समजते..
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला राज्यमंत्री पदाचा दर्जा..
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही राज्य मंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. २०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंदिर समितीला राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता त्यामुळे या समितीवर अध्यक्षपद हे राज्यमंत्री दर्जाचे आहे. मंदिर समिती मध्ये एकूण सदस्यांचे मंडळ आहे. २०१७ साली कराड येथील अतुल बाबा भोसले यांची विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती व त्यांनी सुमारे दोन वर्षाचा कालावधी ही पूर्ण केला होता. २०१९ पासून विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र ज्या राजकीय तिची अध्यक्ष म्हणून निवड होते त्याचे पुनर्वसन करण्यासाठी दिले जात असते
विठ्ठल मंदिर समितीचा अध्यक्ष हा वारकरी संप्रदायातला असाव
पंढरपूरचा पांडुरंग हा वारकरी संप्रदायाचे अखंड दैवत आहे वर्षातील प्रमुख चार वाऱ्या या ठिकाणी भरत असतात त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला त्या दृष्टीने फार महत्त्व आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अध्यक्ष हा वारकरी संप्रदात्यातला असावा याबाबत वारकरी संघटना व महाराज मंडळींकडून मागणी होत आहे. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सध्याचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे नावही काँग्रेसच्या गटातून आघाडीवर असल्याचे समजते औसेकर महाराज यांना वारीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद इच्छुक उमेदवारांची नावे गुलदस्त्यात असल्याचे समजते.
0 Comments