वाढदिवसानिमित्त गारगोटीच्या एका पठ्ठ्याने पेट्रोलच वाटले सवलतीत...!



कोल्हापूर : गारगोटी मधील सहयोग फौंडेशन चे अध्यक्ष सुशांत सर्जेराव माळवी यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. संपूर्ण देशामध्ये असणारी पेट्रोल दरवाढ आणि त्यामुळे निर्माण झालेली महागाई यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलेला आहे.हाच संदर्भ घेत सुशांत माळवी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने वाढणाऱ्या पेट्रोल दर वाढीला चपराक देण्यासाठी १ लिटर पेट्रोल पाठीमागे ३० रुपयांची सवलत देण्यात आली. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पेट्रोल दरवाढ हा केंद्र सरकारचा सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारा एक निर्णय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती. 

पेट्रोल सत्तर रुपये मध्ये मिळत होते याची आठवण या निमित्ताने सर्वसामान्य जनतेला झाली.या अनोख्या उपक्रमात जनतेतून पेट्रोल दरवाढी बद्दल निराशा व्यक्त झाली.

यावेळी यावेळी शेती बाजार उत्पन्न समितीचे संचालक सचिन दादा घोरपडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव दादा देसाई, प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, गारगोटीचे माजी सरपंच राजू काझी, माजी उप सरपंच मोहन शिंदे धनाजी कुरळे,पांडुरंग मगदूम,बाळासाहेब देसाई,अमोल पाटील,सहयोग फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रथमेश मालंडकर, सचिव रोहित तांबेकर, खजिनदार गौरव पाटील, सौरभ पोतदार, नितीन चौगुले, संजय पाटील,शरद मानगावकर, अमित बाबर, संपन्न माळवी, सिद्धेश केसरकर, इंद्रसेन केसरकर, रोहित भांडवले, शंभुराजे चव्हाण, दिगंबर सुतार रमेश बोटे,अभिजित घाटगे,सौरभ भाटे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments