आषाढी यात्रा काळात पंढरीत आठ दिवसाचा संचारबंदीचा प्रस्ताव



पंढरपूर/प्रतिनिधी:

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या आषाढी वारी कालावधीत पंढरपूर शहर व आसपासच्या गावांमध्ये आठ दिवसाच्या संचारबंदी चा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आला आहे ही संचारबंदी १७ जुलै ते २५ जुलै दरम्यान पोलीस प्रशासनाकडून संचार बंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. आषाढी यात्रा काळात स्त्री स्त्री और नाकाबंदी ठेवली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे...

आषाढी वारी सोहळ्यात ८ दिवशीची संचारबंदी

कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या वर्षी प्रमाणे याहीवर्षी आषाढी एकादशी सोहळा प्राथमिक स्वरूपाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला नियमावलीही तयार करून देण्यात आली आहे. त्यामुळे आषाढी वारी सोहळा लोकांची गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर शहर व आसपासच्या गावांमध्ये १७ एप्रिल ते २४ जुलैपर्यंत संचार बंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्या काळात पंढरपूर शहरात १४४ कलम लागू असणार आहे.

पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी असणार 
राज्य सरकारकडून १० मानाच्या पालख्याना एसटी बस च माध्यमातून वाखरी येथे आणले जाणार आहे. त्यानंतर वाखरी ते पंढरपूर साडेचारशे महाराज मंडळी व वारकरी प्रतिनिधींना पायी चालण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तर पोलिस प्रशासनाकडून पंढरपुरातील मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग व चंद्रभागा वाळवंटी प्रदेश येथे कोणत्याही भाविक व वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी सोहळ्याला पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments