‘खरं सांग हे मुल कोणाचं आहे?’, व्हायरल फोटोंमुळे नुसरत जहां ट्रोल


तृणमुल काँग्रेसची (TMC) खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे (pregnancy)  भलतीच चर्चेत आली आहे.

तिच्या लग्नावरून सध्या मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. अलिकडेच तिनं धुमधडाक्यात केलेलं लग्न नाकारलं होतं. दरम्यान आता ती गरोदर असल्याची बातमी समोर येत आहे. नुसरतनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचं बेबी बंब दिसत आहे. मात्र हे फोटो राहून काही नेटकरी तिच्यावर जोरदार टीका करत आहेत.

दयाळूपणा सर्व काही बदलून टाकतं अशा आशयाची कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले होते. मात्र यावर चित्र विचित्र कॉमेंट सध्या टीकाकार करत आहेत. “पतीला फसवून तुला काय मिळालं”, “खरं सांग हे मुल कोणाचं आहे?”, “तुझ्याकडे कुठल्या प्रकारचा दयाळूपणा आहे.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत.

निखिल जैनने (Nikhil Jain) आधीच या प्रेग्नंसी (pregnancy) विषयी खुलासा करत आपल्याला याविषयी काहीही माहित नसल्याचं म्हटलं होतं. तसेच त्या दोघांमध्ये मागील वर्षभरापासून वादविवाद सुरू असून ते ६ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहे. त्यामुळे हे मुलंही त्याचं नसल्यांचा दावा त्यानं केला आहे.


Post a Comment

0 Comments